मुंबई कॅरम संघटनेतर्फे ९ मार्च रोजी कॅरम स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • February 24, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित तसेच मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्सिट्यूट दादर यांच्या सहकार्याने ५८व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन येत्या ९ मार्च रोजी करण्यात आले आहे.

ही कॅरम स्पर्धा एमसीए ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटड दादर, वेस्टर्न रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ७ व सेंट्रल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ८च्या मध्ये, शंकर मंदिराजवळ, दादर, मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे. १२ वर्षांखालील मुले एकेरी, १२ वर्षांखालील मुली एकेरी, १४ वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी अशा चार गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्ह्यांमार्फत १२ वर्षांखालील गटात प्रत्येकी दोन खेळाडू व १४ वर्षांखालील गटात प्रत्येकी सहा खेळाडूंची नावे संलग्न जिल्हा कॅरम संघटनांमार्फत राज्य कॅरम संघटना स्वीकारेल. प्रवेशिका नोंदवण्याची अंतिम मुदत १ मार्च आहे. प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती मानद सचिव अरुण केदार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *