सोलापूर येथे रविवारी बुद्धिबळ स्पर्धा

  • By admin
  • February 25, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

सोलापूर : सोलापूर चेस अकादमीतर्फे सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने रविवार (२ मार्च) सकाळी १० वाजता शांतीसागर मंगल कार्यालय, एम्प्लॉयमेंट चौक येथे १९ वर्षांखालील तसेच १३, ११, ९ व ७ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा शुद्धोहम्‌‍‍ ज्वेलर्स यांनी प्रायोजित केलेल्या आहेत. स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ८ फेऱ्यात होणार असून खेळाडूंना प्रत्येकी १५ मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील गटातील प्रथम क्रमांकासाठी पंधराशे, एक हजार, आठशे, सहाशे, पाचशे, चारशे, तीनशे व दोनशे तसेच १३, ११, ९ व ७ वर्षांखालील गटात देखील रोख पारितोषिकांसह ५५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या खेळाडूंना एकूण २० हजार रुपयापर्यंतची रोख बक्षिसे, ‌‘शुद्धोहम्‌‍‍ चषक‌’ व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे (8888045344) व प्रशांत पिसे (9156815963) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सोलापूर चेस अकादमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सचिव आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड यांनी केले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *