
जेस जोनासन, शेफाली वर्माची धमाकेदार फलंदाजी
बंगळुरू : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव केला आहे. दिल्लीने हा सामना २९ चेंडू शिल्लक असताना जिंकला. त्यामुळे दिल्ली संघ महिला प्रीमियर लीग स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत १२७ धावा केल्या. हे लक्ष्य दिल्ली संघाने केवळ ४ विकेट गमावून साध्य केले. दिल्लीच्या विजयात सर्वात मोठे योगदान जेस जोनासन आणि शेफाली वर्मा यांनी दिले. त्यांनी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने प्रथम फलंदाजी केली, परंतु गुजरात संघाच्या पहिल्या पाचपैकी चार फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही. ६० धावांपर्यंत गुजरात संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, तनुजा कंवर आणि भारती फूलमाळी यांच्यातील ५१ धावांच्या भागीदारीने उत्तर प्रदेशला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. भारतीने नाबाद ४०, डिआंड्रा डॉटिनने २६ आणि तनुजा कंवरने १६ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग फक्त ३ धावा करून बाद झाली. त्यानंतर, भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या जेस जोनासन आणि शेफाली वर्मा यांच्यातील ७४ धावांच्या भागीदारीने दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित केला. जोनासनने नाबाद ६१ धावा केल्या, तर शेफालीने ४४ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज आणि अॅनाबेल सदरलँड लवकर बाद झाल्या पण शेवटी मॅरिझाने कॅपने चौकार मारून दिल्लीचा विजय निश्चित केला.
दिल्ली अव्वल स्थानावर
या सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाने चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले होते आणि पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर होते. पण गुजरातविरुद्धच्या मोठ्या विजयासह दिल्लीने ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीचे सध्या ४ गुण आहेत. सध्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई आणि उत्तर प्रदेश संघाचे प्रत्येकी चार गुण आहेत. तर गुजरात टेबलमध्ये तळाशी आहे.