
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्शुरन्स शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत अजंता फार्मा एससीने बीएमसी स्पोर्ट्स क्लबवर २७ धावांनी विजय मिळवला.
क्रॉस मैदानावर खेळलेल्या या रोमांचक सामन्यात अजंता फार्मा एससीने २० षटकांत ५ बाद १४४ धावा केल्या. रोहन गुढेकरने ४०, जतीन घरतने ३९, संकेत काष्टेने २९* आणि ओंकार रिळकरने २२ धावांची महत्त्वाची खेळी केली.
१४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बीएमसी स्पोर्ट्स क्लबच्या ऋषिकेश पाटकरने ४७ आणि स्वप्नील भोसलेने ४६ धावांची जोरदार लढत दिली. तरीही, आरिश खान (२/५) आणि जयेश म्हात्रे (२/१८) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बीएमसी स्पोर्ट्स क्लबला २० षटकांत ६ बाद ११७ धावा करता आल्या, आणि त्यामुळे अजंता फार्मा एससी ने २७ धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात, युनायटेड पटनी इंडस्ट्रीज एससीने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सला ४ विकेट राखून पराभूत केले.
संक्षिप्त धावफलक
१) अजंता फार्मा एससी : २० षटकांत ५ बाद १४४ (रोहन गुढेकर ४०, जतीन घरत ३९, संकेत काष्टे २९*, ओंकार रिळकर २२; योगेश्वर कडू २/१२) विजयी विरुद्ध बीएमसी स्पोर्ट्स क्लब: २० षटकांत ६ बाद ११७ (ऋषिकेश पाटकर ४७, स्वप्नील भोसले ४६; आरिश खान २/५, जयेश म्हात्रे २/१८).
२) इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स एससी: २० षटकांत ९ बाद ९१ (प्रदीपकुमार गुप्ता नाबाद २२, अभय सेल २०, रितेश पुजारी १९; प्रशांत पाटील ४/९) पराभूत विरद्ध युनायटेड पटनी इंडस्ट्रीज एससी : ११.२ षटकांत ६ बाद ९२ (श्रेयांश सिंग ३५, उत्कर्ष श्रीवास्तव २०; वर्षित बलियान ३/२३, प्रदीप कुमार गुप्ता २/३३).