< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); भारती विद्यापीठाच्या सलोनी जाधवला सुवर्णपदक – Sport Splus

भारती विद्यापीठाच्या सलोनी जाधवला सुवर्णपदक

  • By admin
  • March 2, 2025
  • 0
  • 111 Views
Spread the love

पुणे ः  भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या सलोनी जाधव हिला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुशू स्पर्धेमध्ये नानकॉन स्टाईल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळाले.

सलोनी जाधव ही भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे येथे बीपीईएस तृतीय वर्ष या वर्गामध्ये शिकत आहे. ही स्पर्धा चंदीगड विश्वविद्यालय मोहाली (पंजाब) या ठिकाणी आयोजित केली होती. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सलोनीने सलग तिसऱ्यांदा पदक मिळवले आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये चंदीगड विद्यापीठ मोहाली या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुशू स्पर्धेमध्ये सलोनीने नानकॉन स्टाईल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये जम्मू विश्वविद्यालय जम्मू या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वुशू स्पर्धेमध्ये सलोनीने नानकॉन स्टाईल या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवले होते.

सलोनीच्या या यशाबद्दल भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ विवेक सावजी, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ  के डी जाधव,  भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलसचिव जी जयकुमार, भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ सुहास मोहिते, डॉ राजेंद्र मोहिते, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ नेताजी जाधव, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स्वप्नील विधाते यांनी तिचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *