
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात सातत्यपूर्ण परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात एक्सेलर कंपनीद्वारा परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतींमधून ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या परिसर मुलाखती या विज्ञान शाखेतील संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञानशास्त्र आणि बीसीए तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या होत्या. यात लेखी परीक्षा, गटचर्चा, तोंडी परीक्षाद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या परिसर मुलाखतीद्वारे एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक सरासरी साडेतीन लाख पॅकेज भेटणार आहे. परिसर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मशिप्रचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण हे सातत्यपूर्ण आग्रही असून मार्गदर्शन करीत असतात.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य प्रोफेसर डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ गणेश मोहिते, डॉ अपर्णा तावरे, प्लेसमेंट समन्वयक जितेंद्र झा आदींनी अभिनंदन केले आहे.