
लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट ः जेके सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एआयटीजी अॅव्हेंजर्स संघाने एनआरबी संघाचा चुरशीच्या सामन्यात दोन विकेट राखून पराभव केला. या लढतीत जेके याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. एनआरबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एनआरबी संघाने १८.५ षटकात सर्वबाद १४७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. एआयटीजी अॅव्हेंजर्स संघाने १९.५ षटकात आठ बाद १५१ धावा फटकावत रोमांचक विजय नोंदवला.

या सामन्यात संदीप राठोड याने अवघ्या २९ चेंडूत ५१ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. जेके याने ३१ चेंडूत ४३ धावांची वेगवान खेळी केली. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. सचिन शेडगे याने ३६ चेंडूत ४३ धावा फटकावल्या. त्याने चार टोलेजंग षटकार व दोन चौकार ठोकले. गोलंदाजीत व्यंकटेश सोनवलकर याने १२ धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. प्रज्वल ठाकूर याने २३ धावात तीन गडी बाद केले. रुशी बिरोटे याने २४ धावांत तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः एनआरबी संघ ः १८.५ षटकात सर्वबाद १४७ (सचिन शेडगे ४३, व्यंकटेश सोनवलकर ९, संदीप बलांडे १२, संदीप राठोड ५१, इतर ३०, रुशी बिरोटे ३-२४, प्रज्वल ठाकूर ३-२३, जेके २-२४, डीके १-१३) पराभूत विरुद्ध एआयटीजी अॅव्हेंजर्स ) १९.५ षटकात आठ बाद १५१ (कुणाल जांगडे १५, गौरव भोगले ६, उमेर १४, आदर्श बागवाले ३१, जेके ४३, नितेश विंचूरकर ६, प्रज्वल ठाकूर नाबाद ४, इतर २९, व्यंकटेश सोनवलकर ३-१२, स्वप्नील मोरे १-२१, राहुल दांडगे १-४०). सामनावीर ः जेके.