
पुणे ः गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि विवेक शेवदे यांना मुंबई येथील यॉट क्लब येथे ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे २०२४-२०२५ यावर्षासाठी प्रतिष्ठित द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी समाजामध्ये गिर्यारोहणसारख्या साहसी खेळाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी केलेल्या अथक समर्पित कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तुर्कियेच्या व्हाईस कॉन्सुल राबिया करसल यांच्या हस्ते हा पुरस्कार उमेश झिरपे यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी पोलिस महासंचालक डॉ परमिंदरसिंग पसरिचा, फेसेहाशॉवेलगेब्रे इथिओपियाच्या राजदूत आणिचेंबरचे संस्थापक आणि संयोजक, ट्रान्स एशियन चेंबरऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संचालक, संयोजक व सचिव डॉ संजय भिडे हे या कार्यक्रमात उपस्थित होते.
पीपल्स आर्ट्स सेंटर, मुंबई यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात गिरिप्रेमी संस्थेचे सचिव विवेक शिवदे यांना भारतातील गिर्यारोहण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांचे अथक समर्पण आणि खेळासाठीची आवड यांनी भारतीय गिर्यारोहक समुदायाला प्रेरणा आणि आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ही प्रतिष्ठित ओळख त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनत, चिकाटी आणि उच्च-उंचीच्या शोधात सीमापार करण्याच्या वचनबद्धतेचा दाखला आहे.