
बुद्धिबळ स्पर्धा
सोलापूर ः ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ शिंदे चॅम्पियन चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात १३ वर्षांचा हर्ष हलमल्ली याने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन श्री रमा जगदीश बहुद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुशील कुमार शिंदे बी व्ही प्रशालाचे अध्यक्ष संतोष पैकेकरी, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरद नाईक, प्रा महेश करंजकर, गुरुदत्त पाटील, विशाल पटवर्धन, चंद्रशेखर बसर्गीकर, समीर शिंदे, चंद्रकांत पवार, बिळेणीसिद्ध बिराजदार या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
श्री रमा जगदीश संस्थेचे अध्यक्ष मधुकर नाईक व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन कदम, खजिनदार नीता तांबोळकर शिरीष नाईक, राजू राजपूत, प्रा. शैलेंद्र नाईक यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
अंतिम निकाल
आठ वर्षांखालील गट ः १. नयन कंदीकटला, २. राजवर्धन देशमुख, ३. नमन रंगरेज, ४. पार्थ भांगे, ५. स्वामी विवेक, ६. सिद्धार्थ शेळके, ७. प्रज्ञेश काबरा, ८. रत्नेश घाणेकर, ९. पलक मेसे.
नऊ वर्षांखालील गट ः १. पृथा ठोंबरे, २. प्रतीक हलमल्ली, ३. प्रथम मुदगी, ४. प्रज्ञेश महाडकर, ५. नैतिक होटकर, ६. उत्कर्षा लोखंडे, ७. हिमांशू व्हनगावडे, ८. शिवराज जाधव, ९. कमलीवाले.
दहा वर्षांखालील गट ः १. वेदांत पांडेकर, २. निरंजन ओम, ३. सुरेश इंगळे, ४. विहान कोंगारी, ५. समरजीत देशमुख, ६. श्रेयस कंदीकटला, ७. श्लोक चौधरी, ८. सम्यक सावंत, १०. विराज लंकेश्वर.
११ वर्षांखालील गट ः १. देवदत्त पटवर्धन, २. आदित्य कसबे, ३. आयुष्य जानगवळी, ४. वेद मोहोळकर, ५. श्रीरंग पैकेकरी, ६. अर्णव जोशी, ७. रणविजय रायकर, ८. श्लोक बुंदेले, ९. विनया पैकेकरी.
१४ वर्षांखालील गट ः १. वेद आगरकर, २. शिवम अंबरकर, ३. साईराज घोडके, ४. तन्मय कदम, ५. अथर्व बसर्गीकर, ६. विवेक स्वामी, ७. स्वानंद तापकिरे, ८. सानिध्य जमादार, ९. सुकन्या बिराजदार, १०. आदित्य भिंगारे, ११. यशोदा बिराजदार, १२. विहान राठोड, १३. ओंकार नसले, १४. अनन्या उलभगत, १५. अदिती इनानी.
१९ वर्षांखालील गट ः १. श्रेया संदुपटला, २. स्वराली हातवळणे, ३. ओम गायकवाड, ४. गणेश घोरपडे, ५. श्रीपाद पाटील, ६. वरद लिमकर, ७. प्रथमेश शेटे, ८. गौरांग दासरी, ९. श्रेयस बोबडे, १०. शेख फराह, ११. सुप्रीत घनाते, १२. श्रावणी देवनपली, १३. तेजस मोरे, १४. शेख फराह, १५. विशाखा दहिभाते.
खुला गट ः १. हर्ष हलमल्ली, २. रणवीर पवार, ३. अमर शिंदे, ४. विशाल कल्याणशेट्टी, ५. चंद्रकांत पवार, ६. चंद्रशेखर बसर्गीकर, ७. निनाद कुलकर्णी, ८. महादेव भोरे, ९. तनिष्क शहा, १०. पवन जल्लीपल्ली, ११. श्रीनिवास दंडगळ, १२. अमित मुदगुंडी, १३. गणेश बुक्का, १४. समर्थ कापसे, १५. सुरू नंदकुमार.