
छत्रपती संभाजीनगर :जळगाव येथे नुकत्याच झालेल्या सुवर्णकार समाज क्रिकेट लीग अंतर्गंत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज चषक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या गोल्डन स्टार क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात सुपर किंग, जळगाव संघाने गोल्डन स्टार संघावर मात करत विजेतेपद मिळवले. गोल्डन दुसऱ्या स्थानी राहिला. संघाच्या यशाबद्दल गोल्डन स्टार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कुलथे, सविता महामुणी चकोर, किरण बुटे आदींनी अभिनंदन केले.
उपविजेत्या संघात मंगेश अधापुरे (कर्णधार), अंकुश लोळगे (उपकर्णधार), अमोल उदावंत (आयकॉन खेळाडू), किरण कुलथे, अजिंक्य वडणेने, सचिन शहाणे, वरद कुलथे, नितीन विसपुते, पवन अडाणे, लवकुमार पंधे, अदित्य सोनगीरे या खेळाडूंचा समावेश आहे.