
विविध वयोगटात साईराज, आयुष, नियान, अर्चित विजेते
सोलापूर ः शुद्धोहम् ज्वेलर्स व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या शुद्धोहम् चषक बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त सागर पवार याने सहापैकी सहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच मानांकित सान्वी गोरे व स्वराली हातवळणे यांनी सुरेख खेळ करत अनुक्रमे द्वितीय व तिसरा क्रमांक पटकाविला.
आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त साईराज घोडके याने सातपैकी साडेसहा गुणांसह व आयुष गवळी याने सहा गुण मिळवत अनुक्रमे १३ व ११ वर्षांखालील गटाचे जेतेपद प्राप्त केले. नियान कंदीकटला याने नऊ वर्षांखालील गटात आकर्षक खेळ करत सहा पैकी सहा गुण प्राप्त करत तर अर्चित भुतडा याने ७ वर्षांखालील गटात अव्वल स्थान पटकाविले. अथर्व दनाने, यतीराज माने, निरंजन शहा, विराज पाताडे या खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शांतीसागर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण शुद्धोहम् ज्वेलर्सचे संचालक सिद्धांत गांधी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच युनायटेड फोरम बँक युनियनचे निमंत्रक सुहास मार्डीकर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी किशोर मुनकमपल्ली, शुद्धोहम् ज्वेलर्सच्या संचालक अदिती गांधी, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विजेत्या खेळाडूंना आकर्षक ‘शुद्धोहम् चषक’, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या ५५ खेळाडूंना एकूण २० हजारांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून प्रशांत पिसे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा, यश इंगळे यांनी काम पाहिले.
विजेत्या खेळाडूंचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर चेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड यांनी अभिनंदन केले.
अंतिम निकाल
१९ वर्षांखालील गट ः १. सागर पवार, २. सान्वी गोरे, ३. स्वराली हातवळणे, ४. श्रेयश कुदळे, ५. श्रेयश बोबडे, ६. रणवीर पवार, ७. वेद आगरकर, ८. हर्ष हळमल्ली, ९. श्रेया संदूपटला. १०. यज्ञेश जाधव.
१३ वर्षांखालील गट ः १. साईराज घोडके, २. कार्तिक भागवत, ३. ओम निरंजन, ४. सिद्धी देशमुख, ५. देवदत्त पटवर्धन, ६. अधिराज म्हेत्रे, ७. सुकन्या बिराजदार, ८. आदिती इनानी, ९. विहान राठोड. १०. आरुष गंदलवार.
११ वर्षांखालील गट ः १. आयुष गवळी, २. श्रेयश कंदीकटला, ३. शशांक जमादार, ४. श्रेयश इंगळे, ५. शौर्य चंदनशिवे, ६. आदित्य सोनी, ७. आयुष गायकवाड, ८. जयवीर मोहिते, ९. प्रतीक्षा चाबुकस्वार, १०. श्लोक चौधरी.
९ वर्षांखालील गट ः १. नियान कंदीकटला, २. उत्कर्षा लोखंडे, ३. विवेक स्वामी, ४. मयूर स्वामी, ५. नैतिक होटकर, ६. हर्ष मुसळे, ७. नमन रंगरेज, ८. हिमांशू व्हनगावडे, ९. आरव पवार. १०. शिवराज जाधव.
७ वर्षांखालील गट ः १. अर्चित भुतडा, २. लखित काबरा, ३. ओजस पवार, ४. ऋषभ पामनानी, ५. ऋषभ कोरे, ६. जीवन गड्डम, ७. ईशा पटवर्धन, ८. विराज शेंडगे.