
लाईफलाइन-मासिआ औद्योगिक क्रिकेट ः रुद्राक्ष बोडके सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाइन-मासिआ औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत प्रकाशझोतात झालेल्या सामन्यात मासिआ अ संघाने मस्सिया ब संघावर चार विकेट राखून विजय नोंदवला. या सामन्यात रुद्राक्ष बोडके याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. मासिआ ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८.२ षटकात सर्वबाद १३९ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना मासिआ अ संघाने १९.५ षटकात सहा बाद १४० धावा फटकावत रोमांचक सामना चार विकेट राखून जिंकला.
या सामन्यात शुभम मोहिते याने अवघ्या ३३ चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. योगेश चौधरी याने २० चेंडूत ३३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. रुद्राक्ष बोडके याने चार चौकारांसह ३० धावांची वेगवान खेळी केली. गोलंदाजीत मंगेश निटूरकर याने १२ धावांत तीन विकेट घेत आपला ठसा उमटवला. रुद्राक्ष बोडके यान २० धावांत तीन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. सुमित आगरे यान १६ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः मासिआ ब संघ ः १८.२ षटकात सर्वबाद १३९ (प्रदीप जगदाळे २४, निकीत चौधरी २३, इंद्रजीत उढाण १०, योगेश चौधरी ३३, राजेश शिंदे नाबाद १८, अजिंक्य पाथ्रीकर ९, इतर १७, मंगेश निटूरकर ३-१२, रुद्राक्ष बोडके ३-२०, हितेश पटेल २-३३, रोहन राठोड १-१७) पराभूत विरुद्ध मासिआ अ संघ ः १९.५ षटकात सहा बाद १४० (रुद्राक्ष बोडके ३०, रोहन शाह ८, रोहन राठोड २५, मधुर पटेल ४, मुकीम शेख ४, शुभम मोहिते नाबाद ५१, दत्ता बोरडे नाबाद ६, इतर ११, सुमित आगरे २-१६, राजेश शिंदे २-२३, गिरीश खत्री १-१८, इंद्रजीत उढाण १-२६). सामनावीर ः रुद्राक्ष बोडके.