
पुणे ः कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने शनिवारी (८ मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त युगांडा येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटात सुवर्ण पदक मिळविणारी पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा श्रीनाथ हगवणे हिचा खास सत्कार कोकणस्थ परिवारच्या ज्येष्ठ संचालिका क्रांती शितोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनया पेडणेकर या राहणार आहेत.
हा सत्कार सोहळा नेहरू स्टेडियम पुणे येथे शनिवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. याअगोदर रशिया येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद मिळविणारी आकांक्षा हगवणे ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे, अशी माहिती सुनील नेवरेकर यांनी दिली.