चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रचिन रवींद्रने रचला नवा विक्रम 

  • By admin
  • March 6, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज 

लाहोर ः चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रवींद्र याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीने त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा निर्णय आतापर्यंत योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या सामन्यात न्यूझीलंडची सलामीवीर रचिन रवींद्र याने शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावले. या शतकी खेळीसोबतच त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केले. रचिन याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. त्याने त्याचे सर्व एकदिवसीय शतके फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच झळकावली आहेत हे विशेष.

पहिला न्यूझीलंडचा फलंदाज ठरला
चॅम्पियन्स ट्रॉफी मधील रचिन रवींद्र याचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एकाच हंगामात दोन शतके करणारा तो पहिला न्यूझीलंडचा फलंदाज आहे. रचिन रवींद्र याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये घेतलेली सर्व ५ शतके झळकावली आहेत. याआधी त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात तीन शतके झळकावली होती.

दरम्यान, न्यूझीलंडसाठी सर्वात कमी डावांमध्ये ५ शतके ठोकण्याच्या बाबतीत रचिन रवींद्र दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने २८ डावांमध्ये पाचवे एकदिवसीय शतक झळकावले. या यादीत डेव्हॉन कॉनवेचे नाव सर्वात वर आहे. कॉनवेने २२ डावांमध्ये ५ एकदिवसीय शतके केली होती. यादीत तिसऱ्या क्रमांकावर डॅरिल मिशेल (३० डाव), केन विल्यमसन (५६ डाव) आणि नॅथन अ‍ॅस्टल आहेत.

न्यूझीलंडसाठी सर्वात कमी डावांमध्ये ५ एकदिवसीय शतके

२२ ः डेव्हॉन कॉनवे
२८ ः रचिन रवींद्र
३० ः डॅरिल मिशेल
५६ ः केन विल्यमसन
६४ ः नॅथन अ‍ॅस्टल

चॅम्पियन्स ट्रॉफीत एकाच आवृत्तीत अनेक शतके
३ ः ख्रिस गेल, २००६
२ ः सौरव गांगुली, २०००
२ ः सईद अन्वर, २०००
२ ः हर्शेल गिब्स, २००२
२ ः उपुल थरंगा, २००६
२ ः शेन वॉटसन, २००९
२ ः शिखर धवन, २०१३
२ ः रचिन रवींद्र, २०२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *