अतुल पेरे, नंदकिशोर घुबे, विजय घुबे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  • By admin
  • March 6, 2025
  • 1
  • 253 Views
Spread the love

बुलढाणा ः भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या आठव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देऊळगाव घुबे येथील तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

हरिद्वार (उत्तराखंड) येथे ९ ते ११ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. देऊळगाव घुबे येथील तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून अतुल पेरे याची महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. कबड्डी संघात नंदकिशोर घुबे व विजय घुबे या खेळाडूंची निवड झाली आहे.

हे तीनही खेळाडू ग्रामीण भागातील असून आता देऊळगाव घुबे या गावाचे नाव हरिद्वार येथे गाजणार आहे व हे तीनही खेळाडू अतिशय मेहनती आहेत. भारतीय पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बालाजी कल्याणकर, महासचिव गणेश पेरे व खजिनदार विनोद दाढे यांनी तिघांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

1 comment on “अतुल पेरे, नंदकिशोर घुबे, विजय घुबे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *