
मुंबई ः गोवा येथे होणार्या ४७व्या इंडियन राष्ट्रीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ६५ वर्षांवरील दुहेरीच्या गटात मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा १९ ते २३ मार्च या कालावधीत गोवा येथे होणार आहे.