
साक्षी कानडी, सुषमा पाटील, साक्षी शिंदे, सृष्टी शिंदे यांची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जळगाव महिला संघाने हिंगोली महिला संघाचा सात विकेट राखून पराभव केला. या सामन्यात साक्षी कानडी हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
बिडकीन येथील क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. हिंगोली महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३६.२ षटकात सर्वबाद १८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, जळगाव महिला संघाने ३१.३ षटकात तीन बाद १८५ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात साक्षी कानडी हिने ५६ चेंडूत ८३ धावांची स्फोटक खेळी केली. साक्षीने १३ चौकार मारले. सुषमा पाटील हिने चार चौकारांसह ५० धावांची दमदार अर्धशतक ठोकले. साक्षी शिंदे हिने ४२ चेंडूत आक्रमक ४४ धावा फटकावल्या. तिने चार चौकार मारले. गोलंदाजीत सृष्टी शिंदे हिने १६ धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. स्वामी बेलेकर हिने ४० धावांत दोन गडी बाद केले. श्रावणी दळवी हिने ३५ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः हिंगोली महिला संघ ः ३६.२ षटकात सर्वबाद १८२ (साक्षी शिंदे ४४, अनुश्री स्वामी २६, सोनाली शिंदे २८, धनश्री मोरे १३, श्रावणी दळवी ६, इतर २०, सृष्टी शिंदे ५-१६, स्वामी बेलेकर २-४०, साक्षी कानडी १-२५, निकिता राठोड १-३०) पराभूत विरुद्ध जळगाव महिला संघ ः ३१.३ षटकात तीन बाद १८५ (नेहा शेलार १६, सुषमा पाटील ५०, साक्षी कानडी नाबाद ८३, श्रेया जेउर नाबाद २, इतर ३१, कल्याणी खंडागळे १-२७, श्रावणी दळवी १-३५). सामनावीर ः साक्षी कानडी.