खराब वेळपत्रकावर डेव्हिड मिलर याने फोडले पराभवाचे खापर 

  • By admin
  • March 6, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पाठिंबा 

लाहोर ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाकडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचा शतकवीर डेव्हिड मिलर याने खराब वेळापत्रकाला दोषी ठरवले. आमच्या संघाला सतत प्रवास करावा लागला हे पराभवाचे एक कारण असल्याचे मिलर याने सांगितले. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर आफ्रिकन संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरने एक अतिशय धक्कादायक विधान केले आहे. ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षपणे आयसीसीवर निशाणा साधला आहे. खरं तर, उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, आफ्रिकन संघ कराचीमध्ये शेवटचा गट सामना खेळल्यानंतर थेट दुबईला रवाना झाला. त्यानंतर पुन्हा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी तेथून लाहोरला रवाना झाले. आता उपांत्य फेरीतील पराभवानंतर डेव्हिड मिलर याने याबाबत खराब वेळापत्रकाला दोषी ठरवले आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत दिलेल्या निवेदनात खराब वेळापत्रकाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डेव्हिड मिलर म्हणाला की, आमची फ्लाइट फक्त १ तास ३० मिनिटांची होती. पण आम्हाला प्रवास करावा लागला, जे अजिबात योग्य नव्हते. सकाळी आमची फ्लाईट होती आणि सामना संपल्यानंतर आम्हाला पुन्हा प्रवास करावा लागला आणि आम्ही दुपारी ४ वाजता दुबईला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून सकाळी ७.३० वाजता आम्ही लाहोरला निघालो. आम्ही ५ तासांचा विमान प्रवास केला आणि आम्हाला सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही असे नाही, पण ही परिस्थिती अजिबात चांगली नाही.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पाठिंबा
आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना ९ मार्च रोजी दुबईच्या मैदानावर खेळला जाईल, त्याबाबत डेव्हिड मिलरनेही एक विधान केले ज्यामध्ये त्याने न्यूझीलंड संघाला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. मिलर पुढे म्हणाला की, दोन्ही संघ उत्कृष्ट आहेत. भारत सध्या खूप चांगले खेळत आहे आणि त्यांच्या संघात अनेक सामना जिंकणारे खेळाडू आहेत. न्यूझीलंड संघात असेच काहीसे दिसून येते. हा एक उत्तम सामना होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *