
१३० मुलींचा सहभाग
मुंबई : फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर आणि गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण आणि तंदुरुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
६ मार्च रोजी धारावीतील काळाकिल्ला म्युनिसिपल शाळा संकुल, मुंबई १७ येथे हा उपक्रम पार पडला. या शिबिरात काळा किल्ला म्युनिसिपल शाळेतील १३० मुलींनी सहभाग घेतला आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व शिकले. आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफरी विघ्नेश मुरकर, विन्स पाटील आणि काशीस जैस्वार यांनी विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे तंत्र शिकवत आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला.

या प्रशिक्षण शिबिरात शाळेतील शिक्षक व प्रशिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये अनिता शिंदे (शिक्षिका), रतिलाल बुरूगुंळे (प्रशिक्षक), जयेंद्र कदम (प्रशिक्षक) आणि गणेश गोसावी (प्रशिक्षक) यांनी विशेष योगदान दिले.
स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहराचे अध्यक्ष उमेश मुरकर यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थिनींचा आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला सशक्तीकरण, तंदुरुस्ती आणि आत्मरक्षण कौशल्ये वाढवण्यासाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व होते.