
छत्रपती संभाजीनगर ः प्रथमेश कुलकर्णी बॅडमिंटन अकादमी चिकलठाणातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला बॅडमिंटन खेळाडूंसाठी शनिवारी (८ मार्च) मोफत सराव सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी आठ ते नऊ आणि नऊ ते दहा अशा वेळेत महिला बॅडमिंटन खेळाडूंना मोफत सराव सत्रात सहभागी होता येईल. सराव सत्रानंतर सर्व सहभागी महिला खेळाडूंसाठी एक छोटेखानी सत्कार व उत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रथमेश कुलकर्णी बॅडमिंटन अकादमी टीमतर्फे देण्यात आली.