
जळगाव ः खेलो इंडिया राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगाव मुलींचा संघ घोषित करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पुनम सोनवणे हिची निवड करण्यात आली आहे.
अस्मिता हॉकी राज्यस्तरीय लीग खेलो इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र आयोजित ज्युनियर मुलींची हॉकी स्पर्धा पुणे येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे ९ ते १४ मार्च दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी शुक्रवारी मुलींचा संघ घोषित केला.
मुलींच्या हॉकी संघाला शुभेच्छा देण्यासाठी हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख, हिमाली बोरोले, वर्षा सोनवणे, इम्तियाज शेख, ॲड आमिर शेख, रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकील शेख व आरिफ कुरेशी यांची उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्याच्या मुलींच्या हॉकी संघात उत्कर्षा पाटील, गायत्री बाविस्कर, दीपिका कोळी, पूर्ती पाटील, स्नेहल कोळी, गायत्री कोष्टी, शितल पाटील, कल्याणी आस्वार, देवयानी सोनवणे (कर्णधार), पुनम सोनवणे (उपकर्णधार), नम्रता बाविस्कर, उज्वला पाटील (सर्व जळगाव), सदफ नाज, गौरवी पाटील, मैथली चौधरी, प्रांजल ढाके (सर्व भुसावळ), रितिमा बारेला (अमळनेर), रोहिणी ज्ञानेश्वर कोळी (राखीव) या खेळाडूंचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून खुशी श्रीवास्तव तर प्रशिक्षक इम्रान बिस्मिल्ला व रोहिणी सुतार यांची निवड करण्यात आली आहे.