
शिवाली शिंदे, अदिती गायकवाडची चमकदार कामगिरी
कोल्हापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर महिला संघाने सातारा महिला संघावर १४८ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. या सामन्यात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिने सामनावीर किताब मिळवला.

राजाराम कॉलेज मैदानावर हा सामना झाला. कोल्हापूर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४३ षटकात नऊ बाद ३४७ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. सातारा महिला संघ ४३ षटकात आठ बाद १९९ धावा काढू शकला. कोल्हापूर महिला संघाने १४८ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात कोल्हापूरच्या शिवाली शिंदे हिने तुफानी शतक झळकावले. शिवालीने ६१ चेंडूत १०६ धावांची धमाकेदारा खेळी करुन संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. तिने दोन षटकार व १५ चौकार मारले. अदिती गायकवाड हिने ७४ चेंडूत ९५ धावांची दमदार खेळी केली. तिचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. तिने १७ चौकार मारले. सानिका पाटील हिने ९१ चेंडूत ६१ धावा फटकावल्या. तिने ११ चौकार मारले. गोलंदाजीत तेजश्री ननावरे हिने ६७ धावांत चार विकेट घेतल्या. अक्षता नारतवडेकर हिने ११ धावांत दोन गडी बाद केले. शांभवी देशमुख हिने २८ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः कोल्हापूर महिला संघ ः ४३ षटकात नऊ बाद ३४७ (अंकिता भारती १९, अदिती गायकवाड ९५, अदिती पाटोळे १८, शिवाली शिंदे १०६, अनुजा पाटी ३०, अभिलाषा पाटील २८, संजना वाघमोडे नाबदा १४, इतर ३०, तेजश्री ननावरे ४-६७, समृद्धी बानवणे १-२९, भूमी फाळके १-६२, शांभवी देशमुख २-२८) विजयी विरुद्ध सातारा महिला संघ ः ४३ षटकात आठ बाद १९९ (तेजश्री ननावरे २२, समृद्धी बानवणे ३९, मनस्वी जाधव ८, सानिका पाटील नाबाद ६१, भूमी फाळके १८, इतर ४२, अक्षता नारतवडेकरक २-११, मधुरा इंगवले २-५७, ईश्वरी राणे १-१७, अभिलाषा पाटील १-३३, संजना वाघमोडे १-४५). सामनावीर ः शिवाली शिंदे.