छत्रपती संभाजीनगर ः स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) अंतर्गत फिट इंडिया मोहिमेच्या वतीने आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहकार्याने फिट इंडिया पिंक सायक्लोथॉन आणि वॉकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
ही विशेष मोहीम रविवारी (९ मार्च) सकाळी सहा वाजता विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे पार पडणार आहे. महिला दिन सप्ताहाच्या निमित्ताने सर्व महिलांना आणि मुलींना या सायक्लोथॉन आणि वॉकाथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी देखील या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
या उपक्रमाचा उद्देश महिलांमध्ये फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. सर्व महिला आणि मुलींनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलावे, असे आयोजकांनी सांगितले आहे.