
अहिल्यानगर महिला संघ चार विकेटने पराभूत
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत हिंगोली महिला संघाने अहिल्यानगर महिला संघाचा चार विकेट राखून पराभव केला. या लढतीत अनुश्री स्वामी हिने सामनावीर किताब संपादन केला.
बिडकीन येथील क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. अहिल्यानगर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४६ षटकात सर्वबाद १४१ धावसंख्या उभारली. हिंगोली महिला संघाने ३६.४ षटकात सहा बाद १४३ धावा फटकावत चार विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात हिंगोलीच्या अनुश्री स्वामी हिने ७५ चेंडूत ६६ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. अनुश्रीने १२ चौकार मारले. सॅम हिने सहा चौकारांसहक २९ धावा फटकावल्या. ऋतुजा काळे हिने पाच चौकारांसह २९ धावाचे योगदान दिले. गोलंदाजीत समृद्धी शिंदे हिने २१ धावांत तीन गडी बाद केले. अनुश्री स्वामी हिने २८ धावांत तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. आर्या जाधव हिने १९ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : अहिल्यानगर महिला संघ : ४६ षटकात सर्वबाद १४१ (आरती केदार १८, प्राजक्ता क्यादार ११, ऋतुजा काळे २९, नंदिता दत्ता नाबाद २७, अंबिका वाटाडे ५, समृद्धी शिंदे ५, अक्षदा बेल्हेकर ७, प्रीतम गडाख ८, इतर २९, अनुश्री स्वामी ३-२८, कल्याणी खंडागळे २-४०, आर्या जाधव २-१९, ज्योती शिंदे २-१८, सोनाली शिंदे-सावंत १-२३) पराभूत विरुद्ध हिंगोली महिला संघ : ३६.४ षटकात सहा बाद १४३ (ज्योती शिंदे १८, अनुश्री स्वामी ६६, सॅम नाबाद २९, कविता कुवर नाबाद ५, इतर २३, समृद्धी शिंदे३-२१, श्रेया गडाख २-३१, आरती केदार १-२८). सामनावीर : अनुश्री स्वामी.