
छत्रपती संभाजीनगर ः ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने चमकदार कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघ पात्र ठरला आहे.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने पात्रता फेरीत वीर नर्मदा विद्यापीठ गुजरात संघाचा एक डाव व दोन गुणांनी पराभव केला. या विजयात विजय शिंदे, भरत वसावे, तेजस सातले, सचिन पवार, अनिकेत पवार यांची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. या संघाला डॉ युसूफ पठाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघ व्यवस्थापक म्हणू कपिल सोनटक्के यांनी काम पाहिले. या शानदार कामगिरीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष खो-खो संघ आता अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा उडपी (कर्नाटक) येथे ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.