
रॉयल चेस अकॅडमीतर्फे आयोजन
नागपूर : रॉयल चेस अकॅडमीतर्फे महिलांच्या बुद्धिमत्तेचा आणि स्पर्धात्मकतेचा सन्मान करण्यासाठी नागपूर शहरात दुसऱ्या महिला दिन विशेष बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या स्पर्धेत स्वरा गांधी हिने विजेतेपद पटकावले.
साईशा एंटरप्रायझेस, नारा रोड, जरीपटका येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण २० महिला आणि मुलींनी भाग घेतला, त्यापैकी चार खेळाडू फिडे-रेटेड होत्या. त्यामुळे उच्चस्तरीय स्पर्धा पाहायला मिळाली. अंतिम फेरीत स्वरा गांधी हिने अप्रतिम खेळ करत ५ पैकी ५ गुण मिळवत शनाया शेलकर हिचा पराभव करून विजेतेपद पटकावले. याशिका मुसळे यांनी सृष्टी टाकसांडे यांना पराभूत केले, तर प्रीती पंचवरे यांनी पायल रावत यांच्यावर विजय मिळवला.
ही स्पर्धा सिद्धार्थ करिअर अकॅडमी यांच्या सौजन्याने आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून किरण मुरकुटे, निधी सोनटक्के आणि पायल रावत यांची उपस्थिती होती.
अंतिम निकाल
१. स्वरा गांधी, २. याशिका मुसळे, ३. शनाया शेलकर.