
नागपूर ः एस बी सिटी अ संघाने एसजीआर संघाचा ३ गडी राखून पराभव करून व्हीसीए अंडर १४ आंतर अकादमी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
एस बी सिटी कॉलेज ग्राउंडवर झालेल्या या अंतिम सामन्यात एसजीआर बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २१५ धावा केल्या. यथार्थ ढालेने सर्वाधिक ५३ धावा केल्या, तर सिद्धार्थ नामसानी (३३), अंशुमन वेरुळकर (३३) आणि मोहम्मद उमर शेख (३१) यांनी उपयुक्त योगदान दिले. यजमान संघाकडून गौरव वाणीने ३० धावांत तीन बळी घेतले.
एस बी सिटीच्या खेळाडूंना यजत अंतुरकर याने संघात स्थान मिळवून दिले. यजत अंतुरकरने १०९ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ७५ धावा केल्या. त्याने मेधांश गोयंका (५१) सोबत सातव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.
२५ व्या षटकात सहा बाद १०७ अशा स्थितीत यजमान संघ अडचणीत असताना या दोघांनी एकत्र येऊन संघाला विजयाच्या मार्गावर आणले.
संक्षिप्त धावफलक ः एसजीआर ः ५० षटकांत नऊ बाद २१५ (यथार्थ ढाले ५३, सिद्धार्थ नमसानी ३३, अंशुमन वेरूळकर ३३, मोहम्मद उमर शेख ३१, गौरव वाणी ३-३०) पराभूत विरुद्ध एस बी सिटी कॉलेज अ ः ४७.४ षटकांत सात बाद २१६ (यजत अंतुरकर नाबाद ७५, मेधांश गोयंका ५१, अर्जुन गायगोल ४-३७).