आयपीएलचा १८वा हंगाम २२ मार्चपासून रंगणार

  • By admin
  • March 12, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

मुंबई ः इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. त्यापूर्वी एक भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार आहे.

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५ चा पहिला सामना आरसीबी विरुद्ध खेळणार आहे. आयपीएलचा हा पहिला सामना २२ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. यावेळी आरसीबी संघाने रजत पाटीदारकडे कर्णधारपद सोपवले आहे. तर केकेआरची कमान वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेकडे आहे. या सामन्यापूर्वी येथे एक भव्य उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल.

आयपीएल २०२५ चा उद्घाटन समारंभ कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडियममध्ये होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल. त्याआधी, आयपीएल उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करतील. पण या समारंभात कोणते कलाकार सादरीकरण करतील हे अद्याप निश्चित झालेले नाही.

आयपीएलचा उद्घाटन समारंभ कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी होईल. या सामन्याचे तिकीट हे उद्घाटन समारंभाचे तिकीट असेल. या सामन्याची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. चाहते BookMyShow वर तिकिटे बुक करू शकतात. उपलब्ध किमान तिकिटाची किंमत ३,५०० रुपये आहे.

एकूण १० संघांचा सहभाग

चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद हे आयपीएल २०२५ मध्ये खेळणारे १० संघ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *