
निलंगा ः निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील रोहिणी सूर्यवंशी, संध्या सूर्यवंशी, प्रियंका सूर्यवंशी, साक्षी सूर्यवंशी या विद्यार्थिनींची निवड अखिल भारतीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
अलगप्पा विद्यापीठ, कराकुंडी,तामिळनाडू येथे २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच लोहार वैभव या विद्यार्थ्यांची श्रीनगर, कश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पॉवर लिफ्टिंग आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा चेअध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे तसेच प्राचार्य डॉ माधव कोलपुके व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.