
छत्रपती संभाजीनगर ः अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष संघ जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाचा पुरुष संघ या स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
बंगळुरू नॉर्थ विद्यापीठ या ठिकाणी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धा १४ ते १६ मार्च दरम्यान होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॉल बॅडमिंटन संघात कर्णधार अल्ताफ शकील खान, गौरव गायकवाड, तौफिक शेख, ओम बोबडे, गणेश औताडे, योगेश कोळी, शांतनु बोडके, किरण लोमटे, आदित्य मसने आणि केशव टहरे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू अरबाज सय्यद आणि व्यवस्थापक म्हणून यज्ञेश सुभाष आहेर यांची निवड करण्यात आली आहे.
या खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ संजय चंद्रशेखर, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहिलवार आदींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.