
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या डेरवण यूथ गेम्समध्ये धनुर्विद्या स्पर्धेत श्रेया तेली, देवेंद्र जगताप, आर्यन सकपाळ, तनिष्का नाईकले, किरण राठोड, श्रीराज निकम, शताक्षी पवार, विराज गवस, मिशिका शर्मा, अवनिश गोगावले, शिवराज चव्हाण, सार्थक म्हामुणकर, आर्वी जाधव, विघ्नेश खाके, मृणाल इंदलकर यांनी विविध प्रकारात विजेतेपद पटकावले. विविध जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली.
या स्पर्धेचा अंतिम निकाल
१८ वर्षांखालील मुली रिकर्व्ह प्रकार : १. श्रेया तेली (पुणे), २. श्रावणी राऊत (सातारा) ३. कनिष्का माने (सातारा). मुले : १. देवेंद्र जगताप (सातारा), २. विश्वदीप खोडसे (बीड), ३. श्रेयस पाटील (सातारा).
१८ वर्षांखालील मुले कंपाऊंड प्रकार : १. आर्यन सकपाळ (सातारा), २. पृथ्वीराज माने (कोल्हापूर), ३. अर्जुन मोहिते (रायगड). मुली : १. तनिष्का नाईकेले (पुणे), २. अनन्या पवार.
१४ वर्षांखालील मुली कंपाऊंड प्रकार : १. किरण राठोड (रत्नागिरी), २. आर्या संसारे (सातारा), ३. स्वरा बनसोडे. मुले : १. श्रीराज निकम (सातारा), २. पृथ्वीराज मयेकर (रत्नागिरी), ३. अवनीश यादव (सातारा).
१४ वर्षांखालील मुली रिकर्व्ह प्रकार : १. शताक्षी पवार (सातारा), २. अनिता भिस्माळ, ३. आर्या गायकवाड. मुले : १. विराज गवस (पुणे), २. शौमिक सावंत (सातारा).
१० वर्षांखालील मुली कंपाऊंड प्रकार : १. मिशिका शर्मा, २. त्रिशा खरात. मुले : १. अवनीश गोगावले, २. स्वरूप कासेकर, ३. सर्वांग आयरे.
१० वर्षांखालील मुले रिकर्व्ह प्रकार : १. शिवराज चौहान, २. अर्णव शिंदे, ३. अर्णव किर्दत.
१४ वर्षांखालील इंडियन बॉईज प्रकार : १. सार्थक म्हामुनकर (रायगड), २. श्रेयस पार्टे (सातारा), ३. प्रसाद सागडे (पुणे). मुली : १. आर्वी जाधव (पुणे), २. अभिश्री दातखिळे, ३. जान्हवी पडियार (रत्नागिरी).
१८ वर्षांखालील इंडियन बॉईज प्रकार : १. विघ्नेश खाके (पुणे), २. हर्षवर्धन आंधळे, ३. मोरया मेमणे. मुली : १. मृणाल इंदलकर (सातारा), २. अक्षरा शेलार (पुणे), ३. श्रावणी बनकर.