
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः रितेश जाधव सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत जीएमटीएच संघाने कॅनरा बँक संघावर चार विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात रितेश जाधव याने सामनावीर किताब पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कॅनरा बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १०६ असे माफक लक्ष्य उभे केले. जीएमटीएच संघाने १५.२ षटकात सहा बाद ११० धावा फटकावत चार विकेटने सामना सहजपणे जिंकला.

या सामन्यात प्रणीत दीक्षित याने ४९ चेंडूत ४० धावा फटकावल्या. प्रणीतने पाच चौकार मारले. स्वप्नील जेजूरकर याने २७ चेंडूत ३२ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने चार चौकार मारले. दादासाहेब याने दोन चौकारांसह २४ धावा काढल्या. गोलंदाजीत रितेश जाधव याने १८ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. सुनील भगत याने २० धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. राहुल हिवाळे याने ७ धावांत एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः कॅनरा बँक संघ ः २० षटकात नऊ बाद १०६ (आकाश बोराडे १२, आकाश अभंग ११, धीरज बहुरे ५, ग्यानोजी गायकवाड ११, प्रणीत दीक्षित ४०, सुनील भगत ५, बाळू चौतमल ९, रितेश जाधव ४-१८, अर्जुन पटेल १-१४, राहुल हिवाळे १-७, दादासाहेब १-१३, अमोल दौड १-३४) पराभूत विरुद्ध जीएमटीएच संघ ः १५.२ षटकात सहा बाद ११० (स्वप्नील जेजूरकर ३२, नितीन पुंगळे ८, शिवाजी बोचरे ५, दादासाहेब नाबाद २४, अमोल दौड १४, रितेश जाधव नाबाद १२, इतर १५, सुनील भगत ४-२०, राम मंदाडे १-२१, आकाश बोराडे १-२३). सामनावीर ः रितेश जाधव.