
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः रुशी बिरोटे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत एआयटीजी संघाने सीमेन्स एनर्जीझर्स संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारला. या लढतीत रुशी बिरोटे याने सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. सीमेन्स एनर्जीझर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय सीमेन्स संघाला महागात पडला. एआयटीजी संघाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर सीमेन्स संघ २० षटकात ९१ धावांत सर्वबाद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना एआयटीजी संघाने अवघ्या १०.१ षटकात तीन बाद ९२ धावा फटकावत सात गडी राखून सामना जिंकला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात आदर्श बागवाले याने २० चेंडूत २९ धावा काढल्या. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. मयंक विजयवर्गीय याने २० चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. त्याने पाच चौकार मारले. अभिजीत मोरे याने ३३ चेंडूत २८ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत नितेश विंचुरकर याने ८ धावांत दोन गडी बाद केले. जेके याने १४ धावांत दोन बळी टिपले. रुशी बिरोटे याने १७ धावांत दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः सीमेन्स एनर्जीझर्स संघ ः २० षटकात सर्वबाद ९१ (अझहर १७, अभिजीत मोरे २८, नितीन निकम १९, जेके २-१४, रुशी बिरोटे २-१७, नितेश विंचुरकर २-८, उमर काझी १-१०, मयंक विजयवर्गीय १-१६, आदर्श बागवाले १-२०) पराभूत विरुद्ध एआयटीजी संघ ः १०.१ षटकात तीन बाद ९२ (कुणाल जांगडे ८, जेके ९, आदर्श बागवाले नाबाद २९, उमर काझी ४, मयंक विजयवर्गीय नाबाद २८, इतर १४, अमोल गवळी २-२७, अभिजीत मोरे १-२६). सामनावीर ः रुशी बिरोटे.