
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : सुदर्शन एखंडे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस संघाने एमजीएम संघावर सहा विकेट राखून मोठा विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात सुदर्शन एखंडे याने सामनावीर किताब पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर हा सामना प्रकाशझोतात झाला. एमजीएम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमजीएम संघाने १९.१ षटकात सर्वबाद १२३ असे माफक लक्ष्य उभे केले. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना शहर पोलिस संघाने हा सामना १७.३ षटकात चार बाद १२५ धावा फटकावत सहा विकेट राखून सहज जिंकला.

या लढतीत आर्यन शेजुळ याने ३७ धावांची वेगवान खेळी केली. आर्यनने तीन चौकार मारले. पांडुरंग गाजे याने दोन चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. अमर असोलकर याने २२ धावा काढल्या. त्याने एक षटकार व तीन चौकार मारले. गोलंदाजीत दीपक याने २० धावांत तीन गडी बाद केले. सुदर्शन एखंडे याने १४ धावांत तीन विकेट घेत सामना गाजवला. ओमकार मोगल याने २४ धावांत दोन गडी बाद केले. सागर शेवाळे याने १७ धावा आणि दोन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक ः एमजीएम संघ ः १९.१ षटकात सर्वबाद १२३ (अमित पाठक २१, अमर असोलकर २२, अक्षय बनकर १५, लक्ष्मण सूर्यवंशी १६, सागर शेवाळे १७, इतर २३, सुदर्शन एखंडे ३-१४, दीपक ३-२०, ओमकार मोगल २-२४, राजू परचाके १-२५, पांडुरंग गाजे १-७) पराभूत विरुद्ध शहर पोलिस संघ ः १७.३ षटकात चार बाद १२५ (सुदर्शन एखंडे १८, डॉ रणजित पाटील १२, आर्यन शेजुळ नाबाद ३७, पांडुरंग गाजे नाबाद ३१, इतर २६, सागर शेवाळे २-२४, डॉ मयूर राजपूत १-२०). सामनावीर : सुदर्शन एखंडे.