
छत्रपती संभाजीनगर ः पांडुरंग कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ श्रीनिवासराव टाकळकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पंढरीनाथ टाकळकर हे रोकडा हनुमान कॉलनीतील विज्ञान वर्धिनी शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. भाऊसाहेब टाकळकर म्हणून ते परिचीत होते. एक शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी एलएलबीचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सर्व थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
विज्ञान वर्धिनी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका कुमुद टाकळकर यांचे ते पती होत. मिलिंद टाकळकर व सचिन टाकळकर यांचे ते वडील होते. किरण टाकळकर, राजेंद्र टाकळकर यांचे ते काका होते.