
चिपळूण : सावर्डे डेरवण येथील यूथ गेम्सच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. दि. १० ते १३ मार्च या कालावधीत १८ वर्षांखालील वयोगटात खेळविण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेत ३४ संघ सहभागी झाले होते. एकूण ४६ सामने खेळविण्यात आले. तीन गटात खेळविण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये एकूण ८० गोलांची नोंद झाली.
या स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरच्या संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत गडहिंग्लज कोल्हापूर युनाटेडचा सक्षम तांदळे हा गोल्डन बुट पुरस्काराचा मानकरी ठरला. याच गटात मुलींमध्ये कोल्हापूरच्या संजीवन स्पोर्ट्स अकॅडमी संघाने विजेतेपद मिळवले. कोल्हापूरच्या एस. थ्री. सॉकर संघाने उपविजेतेपद मिळवले. पूर्वा भोसले गोल्डन बुट पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तसेच १४ वर्षांखालील मुलांमध्ये कोल्हापूरच्या स्वराज्य अकॅडमी संघाने विजेतेपद मिळवले. कोल्हापूर येथील दूधगंगा व्हॅली संघ उपविजेता ठरला. ब्रिजेश माळी हा गोल्डन बूटचा विजेता ठरला आहे.