
चिपळूण : डेरवण यूथ गेम्सच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या १० तर मुलींच्या ४ अशा १४ संघांनी सहभाग घेतला होता. मुलींच्या स्पर्धेत सातारा येथील वाई व्हॉलिबॉल क्लब विजेता ठरला तर कोल्हापुरातील न्यू हॉरिझन स्कूल गडहिंग्लज संघाने उपविजेतेपद मिळवले. तसेच मुलांच्या स्पर्धेत चिपळूण कुचांबे येथील टीसीसी विजेता तर रत्नागिरीतील अक्षय-११ उपविजेता ठरला आहे.