
नागपूर ः आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विविध क्षेत्रातील आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱया २३ महिलांचा सत्कार करण्यात आला.
नागपूर जिल्ह्यातील बाबुराव धनवटे सभागृह शंकर नगर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमाला संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीचे माजी कुलगुरू डॉ कमल सिंह आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनेश्वर यांच्यासह मान्यवर प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष संजय पवार, उत्तर भारताचे अध्यक्ष डॉ अशोक कप्ता, नागपूर जिल्ह्याचे सचिव डॉ पूर्णिमा कप्ता, अध्यक्ष सुधाकर पाटील आणि नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष माया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची माहिती नेहा रेभे आणि इशित्ता कप्ता यांनी दिली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे क्रीडा, शिक्षण, व्यवसाय, औषध, पोलिस आणि सामाजिक कार्य यासह विविध क्षेत्रातील २३ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यापैकी ३ महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि २० महिलांना राज्य पुरस्कार मिळाले. या कार्यक्रमात प्रा अनुजा जिचकार, सुनीता मालविया, आशा गोहणे, मानसी बोदेले, ज्योती कुंटे, ज्योती भोयर, संगीता बांबोडे, गीता आगासे, वर्षा कोयचाळे, माधुरी मेघे, डॉ वैशाली फटिंग, शुभांगी नारळे, चेतना निघोट, डॉ दयमंती खडसे, शोभा राठोर, मेघा तांदुळकर, डॉ सुरेखा धात्रक, मंजुषा हिरुडकर, रागिणी धात्रक, सुनीता नारायणपुरे, डॉ अपर्णा चौहान, सुनीता देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार यांनी केले. मुनेश्वर यांचे अतिथी भाषण आणि डॉ कमल सिंग यांचे प्रभावी भाषण होते. डॉ माया गायकवाड यांनी आभार मानले. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशनतर्फे महिलांना प्रमाणपत्रे आणि मानपत्रे देऊन पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
डॉ कप्ता यांनी त्यांच्या आई शांता कप्ता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिचिन्ह आणि बॅचेस भेट दिले. कार्यक्रमाचा समारोप रेणू सिद्धूने सर्व सदस्यांना अल्पोपहार देऊन केला.