
मेरठ येथे २१ मार्चपासून स्पर्धेला प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर ः अखिल भारतीय आंतर विद्यापीठ किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला व पुरुष किक बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला आहे. हा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन २१ ते २५ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठ संघाचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरातून १३ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. या खेळाडूंना प्रशिक्षक रुपेंद्र पारचा यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या संघाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी संचालक डॉ संदीप जगताप, क्रीडा मंडळ सदस्य सुरेश मिरकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर किकबॉक्सिंग संघटनेचे सचिव अनिल मिरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
महिला संघ
रिद्धी प्रवीण सोमवंशी (छत्रपती शाहू महाविद्यालय, लासुर), रोशनी सुरेश पाटील (दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज), प्रज्ञा तानाजी सुरवसे (आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, नळदुर्ग), अश्वेता शिवाजी गायकवाड (एएससी महाविद्यालय नळदुर्ग), सुहानी राजेश त्रिवेदी (जेईएस महाविद्यालय जालना).
पुरुष संघ
राज संजय कोल्हे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), कृष्णा भानुदास वनवे (बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी), प्रशांत ईश्वर सूर्यतळ (दगडोजीराव देशमुख महाविद्यालय, वाळूज), ऋषिकेश बलभीम बेद्रे (सावरकर महाविद्यालय बीड), रोहन प्रल्हाद रुपनवर (बी. डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी), आदर्श राजेश रेड्डी (राष्ट्रीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर), सुमित बबन जाधव (पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), हर्षल पंढरीनाथ रोकडे (सागर बीसीए महाविद्यालय देवमूर्ती जालना).