
ठाणे ः पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समितीतर्फे अहिल्यादेवी दौड प्रमुख प्रमोद वाघमोडे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
समारोह समितीच्या अध्यक्ष अॅड रुचिकाताई शिंदे यांच्या हस्ते प्रमोद वाघमोडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सदस्यांमार्फत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अस्मिता वाहिनी आकाशवाणी केंद्राच्या वृंदा टिळक, जयश्रीताई कुलकर्णी, प्रसाद दातार, प्रफुल शिंदे, राजीव मेहेंदळे, प्रतिष्ठानचे अनिल जरक, सुरेश भांड यांची उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्या दौड कायमस्वरूपी आयोजन करायचा मानस प्रमोद वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केला.