
धुळे ः दोडाईचा येथे झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत केव्हीपीएस बॉक्सिंग क्लबच्या ७ महिला बॉक्सिंग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि आपापल्या वयोगटामध्ये ३ सुवर्ण पदक आणि ४ रौप्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत नताशा आबा पावरा, हेतल भूषण पाटील, दीपाली विलास रामुडे यांनी सुवर्णपदक तर पंखुडी बंटी सारसर, मानसी उमेश पाटील, आकांक्षा किशोर सारसर, कीर्ती विजय महाले यांना रौप्य पदक पटकावले.
बॉक्सिंग स्पर्धेचे बेस्ट लूजर बॉक्सर किताब पंखुडी सारसर हिला मिळाला. या स्पर्धेत क्लबच्या महिला पंच पूनम उठवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत ऋषिकेश अहिरे, भूषण पवार, दर्शन कोळी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या सर्व बॉक्सिंग खेळाडूंना संस्थेचे बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव, राज पाटील, ओम राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. या विजयी खेळाडूंना धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आणि किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त रोहित बाबा रंधे, क्रीडा संचालक डॉ एल के प्रताळे, संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा राकेश बोरसे, धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे आदींनी अभिनंदन केले.