हॅरी ब्रूकवर घातलेल्या बंदीचे मोईन अलीकडून समर्थन 

  • By admin
  • March 18, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

नवी दिल्ली ः आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे बीसीसीआयने इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या निर्णयाचे इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने समर्थन केले आहे. 

इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा असा विश्वास आहे की शेवटच्या क्षणी आयपीएलमधून माघार घेणाऱ्या हॅरी ब्रुकवर बीसीसीआयने घातलेली दोन वर्षांची बंदी कठोर नाही. ब्रूकने सलग दुसऱ्यांदा आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले आहे. आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होईल. सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघात सामील होण्यासाठी येत आहेत.

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याने स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासोबतचा करार रद्द केला. २६ वर्षीय खेळाडू हॅरी ब्रूक आयपीएलसाठी स्वतःला अनुपलब्ध घोषित करण्याचा हा सलग दुसरा हंगाम आहे. यावर, मोईनने ‘बियर्ड बिफोर क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की,  हा कठोर निर्णय नाही. मी याच्याशी सहमत आहे. बरेच लोक त्यांची नावे मागे घेतात आणि नंतर परत येतात आणि त्यांना चांगले आर्थिक पॅकेज मिळते. यामुळे खूप गोंधळ होतो. खूप बदल करावे लागतील.

आजीच्या निधनामुळे हॅरी ब्रूक याने आयपीएलच्या मागील हंगामातून माघार घेतली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल नियमांनुसार, जर एखाद्या परदेशी खेळाडूची लिलावात निवड झाली आणि तो फिट नसल्याने स्पर्धेत खेळला नाही, तर त्याला दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाऊ शकते.
नवीन नियमामुळे ब्रूकवर बंदी घालण्यात आली होती
गेल्या वर्षी संघांसोबत शेअर केलेल्या बीसीसीआयच्या कागदपत्रांनुसार, “कोणताही परदेशी खेळाडू जो लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध घोषित करतो, त्याला आयपीएल आणि आयपीएल लिलावात दोन हंगामांसाठी भाग घेण्यास बंदी घातली जाईल.”

मोईन म्हणाला की, विसरून जा, जर तुम्ही तुमचे नाव मागे घेतले तर नियम असा आहे की कौटुंबिक कारण किंवा दुखापत नसल्यास तुम्हाला बंदी घातली जाईल. मी या नियमाशी सहमत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *