
तृप्ती अंधारे, कृष्णा पवार कर्णधारपदी
छत्रपती संभाजीनगर ः ठाणे येथे १९ मार्चपासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत. कृष्णा पवार आणि तृप्ती अंधारे यांच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाथ्रीकर, डॉ बाळासाहेब पवार, बळवंत पाटील, गौतम सोनवणे, प्रशिक्षक अमोल काळे व सचिव डॉ माणिक राठोड यांनी महिला व पुरुष संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
पुरुष कबड्डी संघात कृष्णा पवार (कर्णधार), गणेश चव्हाण, दत्ता बोराडे, योगेश चव्हाण, प्रसाद मगर, अल्केश चव्हाण, दीपक डाके, समाधान ठाले, सनी पवार, नितीन जाधव, राहुल टेके, आदेश जाधव यांचा समावेश आहे. संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल काळे आणि संघ व्यवस्थापक म्हणून विठ्ठल शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला कबड्डी संघात तृप्ती अंधारे (कर्णधार), प्राची शेळके, मनीषा खांडेकर, सानिका डेकाटे, सुहानी देशमाने, सीमा कोल्हे, दिव्या पंडुरे, किर्ती ठाले, रुतुजा पाठक, भाग्यश्री मुळे, शीतल ढोणे, सेजल करचुंडे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी पवन राठोड आणि संघ व्यवस्थापक म्हणून केतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.