
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : प्रदीप जगदाळे, अजिंक्य पाथ्रीकरची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मास्सिया ब संघाने शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज संघाचा ५० धावांनी पराभव केला. या लढतीत प्रदीप जगदाळे याने सामनावीर किताब पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. मास्सिया ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १८.४ षटकात नऊ बाद १३९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज संघाने ९.४ षटकात सहा बाद ८९ धावा काढल्या. मास्सिया ब संघाने ५० धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात प्रदीप जगदाळे याने ३३ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी साकारली. प्रदीपने धमाकेदार फलंदाजी करताना दोन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. निखिल कदम याने ३१ चेंडूत ३१ धावांची वेगवान खेळी साकारली. निखिल याने तीन चौकार मारले. संदीप खोसरे याने १९ चेंडूत ३० धावांची दमदार खेळी केली. संदीप याने सहा चौकार मारले. गोलंदाजीत प्रदीप जगदाळे याने केवळ चार चेंडू टाकत तीन विकेट घेऊन सामन्यात सनसनाटी निर्माण केली. प्रदीपने तीन बळी टिपत सामनावीर किताब संपादन केला. सहज लांबा याने १६ धावांत तीन गडी बाद केले. अजिंक्य पाथ्रीकर याने ३ षटकात ३० धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेत लक्षवेधक कामगिरी नोंदवली.
संक्षिप्त धावफलक : मास्सिया ब संघ : १८.४ षटकात नऊ बाद १३९ (इंद्रजीत उढाण २५, निकित चौधरी १५, प्रदीप जगदाळे ४५, निखिल कदम नाबाद ३१, सहज लांबा ३-१६, संदीप खोसरे २-२८, बन्सी पाटील १-१९, राहुल पाटील १-१७, विपुल भोंडे १-७) विजयी विरुद्ध शेंद्रा कंबाईंड इंडस्ट्रीज संघ : ९.४ षटकात सहा बाद ८९ (संदीप खोसरे ३०, प्रवीण नागरे २८, विजू गोडसे नाबाद १२, राहुल पाटील ६, पवन कावळे १०, प्रदीप जगदाळे ३-०, अजिंक्य पाथ्रीकर २-३०). सामनावीर : प्रदीप जगदाळे.