न्यू सोलापूर क्लबच्या प्रभाकर देवकते, सोनाली शिंदे महाराष्ट्र खो-खो संघात

  • By admin
  • March 19, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

सोलापूर ः अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खो-खो संघात न्यू सोलापूर क्लबच्या प्रभाकर देवकते व सोनाली शिंदे यांची निवड झाली आहे.  

केंद्र शासनाच्या वतीने अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दिल्ली येथे २१ ते २४ मार्च या कालावधीत होणार आहेत. त्यात ते महाराष्ट्र शासनाच्या खो-खो संघातून प्रतिनिधित्व करतील. देवकते हे सध्या मुंबई पोलिस आस्थापनेवर तर शिंदे या सिव्हिल हॉस्पीटल सोलापुर येथे कार्यरत आहे. या दोघांची सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या खो-खो संघात निवड झालेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल न्यू सोलापूर खो-खो क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार व सचिव प्रथमेश हिरापुरे, उपाध्यक्ष संतोष कदम व खजिनदार गोकुळ कांबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *