रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा २५ मार्चपासून

  • By admin
  • March 19, 2025
  • 0
  • 76 Views
Spread the love

सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूरच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेस बुधवारी (२५ मार्च) येथील रेल्वेच्या डॉ. आंबेडकर क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.

मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर व विभागीय स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने सुरू असलेली ही स्पर्धा मुंबईच्या टाइम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेनंतर महाराष्ट्रातील सर्वात जुनी गेली ७७ वर्षे अखंडपणे सुरू असलेली व सोलापुरातील एकमेव क्रिकेट स्पर्धा आहे.

ही स्पर्धा अ व ब या दोन गटात होणार असून अ गटाची स्पर्धा ४० तर ब गटाची स्पर्धा २० षटकांची आहे. स्पर्धेची सुरुवात ब गटापासून होणार असून ब गटामध्ये पहिल्या ३२ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. ब गटातील विजेत्या संघास अ गटामध्ये प्रवेश मिळणार आहे. अ गटामध्ये निमंत्रित १६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे.

स्पर्धेतील अ गटातील विजेत्या व उपविजेता संघांना रोख २५ व १५ हजार रुपये तर ब गटातील विजेत्या संघास रोख २१ व ११ हजार रुपये व करंडक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक व मालिकावीर यांना रोख बक्षीस व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.

नाव नोंदणीसाठी विक्रांत पवार (9421041599) अथवा वासुदेव दोरनाल (9890779829) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *