
सोलापूर ः इचलकरंजी येथे होणाऱ्या भाई नेरुरकर करंडक राज्य खो-खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पुरुष व महिला दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.
शेवगाव (अहिल्यानगर) येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतलेल्या पुरुष व महिला जिल्हा संघाचे सराव शिबीर गुरुवारी (२० मार्च) सुरू होणार आहे. पुरुष संघाने हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुनील चव्हाण यांच्याशी तर महिला संघाने वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर मोहन रजपूत यांच्याशी सकाळच्या सत्रात संपर्क साधावा. जे खेळाडू उपस्थित राहणार नाहीत किंवा येणार नाहीत त्यांनी तातडीने कळवावे. अन्यथा त्याऐवजी राखीव खेळाडूंना संधी देण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए बी संगवे यांनी कळविले आहे.