जलतरण साक्षरता, महिला जलतरण प्रशिक्षण शिबिराचा समारोप

  • By admin
  • March 19, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या सहकार्याने व राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत जलतरण साक्षरता व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सिद्धार्थ जलतरण तलावावर करण्यात आले होते.

या शिबिराचा मुख्य उद्देश्य म्हणजे महिलांसाठी जलतरण साक्षरता व जलतरण साक्षरते मध्ये महिलांचे महत्व काय आहे हे विशद करणे होता. सर्वसाधारणपणे पुरुषांच्या तुलनेत महिला सभासदांचे जलतरण कौशल्य शिकण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्याची असंख्य कारणे आहेत. त्या संपूर्ण कारणांना फाटा देत महिलांना जलतरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करणे, त्यांच्या मनातील पाण्याविषयी भीती दूर करणे, पोहण्या संबंधी काही संकुचित विचार त्यांच्या मनात असतील तर त्यांच्या प्रश्नांचे निरसन करणे, जलतरणाचे असंख्य फायदे महिलांसाठी आहेत आणि ते फायदे व त्यांचे महत्व संपूर्ण महिला वर्गापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा होतो असे संयोजक राजेश भोसले यांनी सांगितले.

स्वतः साठी एक तास आणि तो ही पोहण्यासाठी काढला तर महिला वर्गाच्या असंख्य व्याधी व समस्या दूर होतील. त्या तुलनेत अधिक तंदुरूस्त वाटू लागेल. तसेच त्यांची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास राजेश भोसले यांनी व्यक्त केला.

राजेश भोसले म्हणाले की, एक महिला जलतरण कौशल्य शिकली तर संपूर्ण कुटूंब जलतरणाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. जलतरण साक्षर व प्रशिक्षित होईल. जेणे करून पाण्यात बुडूण होणारे अपघात सुद्धा कमी होण्यास मदत होईल. तसेच
महिलांसाठी जलतरणाच्या एकूण फी मध्ये २० टक्के सुट मिळाली आहे. त्याची माहिती महिलांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. असा हा अनोखा उपक्रम घेण्यामागचा उद्देश होता आणि तो मोठया प्रमाणात यशस्वी झाला.

शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी यात हिरारीने सहभाग नोंदवला हे विशेष. त्यात प्रामुख्याने डॉ विजय व्यवहारे, प्रदीप पिंपळनेरकर, ऋत्विक जगदाळे, विजय भोसले, शशांक रंगारी, प्रशमेश गुलबे, अंजुषा मगर, करिष्मा मोटे, पौर्णिमा भोसले, वंदना वाघमोडे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *