
नांदेड ः नांदेड स्पोर्ट डान्स संघटनेच्या सहसचिवपदी गौरव सोनकांबळे (उदगीरकर) यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्पोर्ट डान्स संघटनेला सलग्न असलेल्या नांदेड स्पोर्ट डान्स संघटनेच्या सहसचिवपदी डान्स क्षेत्रात लोकप्रिय असलेले गौरव सोनकांबळे यांची नांदेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने निवड करण्यात आली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने डान्स या प्रकाराला शालेय खेळ म्हणून मान्यता दिली असून १९ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या जिल्हा विभाग व राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्यातून होतकरू डान्सर्संना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थांना डान्सचे धडे देऊन कुशल नृत्य कलाकारांना न्याय देण्यासाठी गौरव सोनकांबळे यांची नांदेड जिल्हा संघटनेवर सहसचिव म्हणून प्रा जयपाल रेड्डी यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे वाडी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पावडे, राज्य डान्स असोसिएशनचे पुरुषोत्तम जगताप, मुन्ना कदम, कोडेकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.