
ठाणे ः चिपळूण तालुक्यातील डेरवण युथ गेम्स स्पर्धेत एसएमएम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेमध्ये सई संतोष पालांडे हिने बारा वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये तीन सुवर्ण व तीन रौप्य अशी सहा पदकाची कमाई करुन स्पर्धा गाजवली. तसेच अथर्व रवींद्र परब याने थाळीफेक प्रकारात सोळा वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले. अभिराज वाळुंज याने बारा वर्षांखालील गटात ५० मीटर धावणे प्रकारात कांस्य पदक जिंकले.
या शानदार कामगिरीबद्दल मुख्याध्यापक रोशन वाघ, क्रीडा प्रशिक्षक प्रमोद वाघमोडे तसेच सर्व एसपीसी प्रशिक्षक यांचे सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे. त्यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.